पिंपरी (Pclive7.com):- कै. विलास (आप्पा) रघुनाथ काळभोर यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त कै. विलास आप्पा काळभोर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय भाऊ काळभोर यांच्या पुढाकाराने अनाथ व दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत पुण्यस्मरणाचा दिवस सेवाभावी कार्यातून साजरा करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत प्रथम रावेत येथील झूंज दिव्यांग संस्था, आश्रम प्रशिक्षण केंद्र येथे अनाथ व दिव्यांग मुलांना गरजेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. मुलांच्या दैनंदिन उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे वितरण करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर थेरगाव येथील इमॅन्युअल ऑर्फनेजमध्ये अनाथ मुलांसाठी अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मुलांना भोजन देऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आला. उपस्थितांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मित्र परिवार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत अजय भाऊ काळभोर यांच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले.

कै. विलास आप्पा काळभोर यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






















Join Our Whatsapp Group