पिंपरी (Pclive7.com):- काल बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन आज भाजपच्या वतीने करण्यात आले. या उड्डाण पुलाचे उद्घाटन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, शैलजा मोरे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य अमित गावडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, विजय भोजणे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
निगडी येथे उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ८४९ मीटर असून रुंदी सुमारे १७.२ मीटर आहे तर उंची सुमारे ८.५ मीटर एवढी आहे. याकामी सुमारे २४ कोटी ६२ लाख इतकर खर्च करण्यात आलेला आहे. पुणे मुंबई रस्त्याला समांतर उड्डाणपूलाखालुन बीआरटी टर्मिनल व पीएमपीएमएल च्या डेपोकडून सर्व बसेस सहज धावणार असून प्रवासाच्या वेळेत व इंधन बचत होणार असून वायू प्रदुषणात घट होऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.
आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.






















Join Our Whatsapp Group