पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड परिसरात आज (दि.११) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही. नभ दाटून आल्याने शहरातील काही भागात पाऊसाच्या हलक्या सरी बरसल्या.
शहर व परिसरात अर्धा तास हलक्या सरी कोसळल्या. अवेळी आलेल्या पाऊसाने माॅर्निंग वाॅक आणि इतर कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पहाटे तारांबळ उडाली. पाऊसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान, आज (दि.११) आणि उद्या (दि.१२) पुणे आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाच्या पाऊसाची पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.






















Join Our Whatsapp Group