पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेवक सुरदास गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कोरोना योध्दांचा तसेच फुगेवाडी जेष्ठ नागरिकांवर विशेष सहकार्य असल्याकारणाने सर्व उपस्थित जेष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका माजी नगरसेविका संध्याताई सुरदास गायकवाड माध्यमातून प्रथम पुण्यस्मरणचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवाराकडून जवळचे नातेवाईक व हितचिंतकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. तरी देखील पंचक्रोशीतील नागरिक, समाजबांधव, नातेवाईक, व्यापारी, नेते, समाजसेवक स्वताहून उपस्थित राहिले.
यावेळी नगरसेवक रोहित (आप्पा) काटे, राजू बनसोडे,माजी नगरसेवक सनी ओव्हाळ, भाजपचे माजी रचिटणीस प्रकाश जवळकर, शिवसेनेचे तुषार नवले, लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उद्योजक अशोक पुजारी, सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव, हेमंत फुगे, मनोज वाखारे, रवी कांबळे, टकारी समाजचे अध्यक्ष रणजित गायकवाड, जेष्ठ नागरिक शिवाजीराव शिर्के,जयवंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी नगरसेवक सुरदास गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुगेवाडी गावातील कोरोना योध्दा म्हणजेच सफाई कर्मचारी यांना फाउंडेशनच्या माध्यमातून प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी स्वर्गीय माजी नगरसेवक सुरदास गायकवाड यांनी केलेल्या मदतीबाबत माहिती दिली. तसेच समाजबांधव व परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.