पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आळंदी पोलिस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गांजा तसेच बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या महिलेवर छापा टाकून कारवाई केली. अंबिका मारुती गरुड (वय ५५ वर्षे, रा. घुंडरे आळी, आळंदी ता.खेड जि.पुणे) असं अटक केलल्या महिला आरोपीचं नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशान्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यास प्रतिबंध तसेच अंमली पदार्थाच्या गैर व्यवहारास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा पथक हे आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त करत असतांना सामाजिक सुरक्षा पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक महिला अंबिका गरुड ही तिच्या घराच्या समोर अंमली पदार्थ गांजा तसेच विविध देशी विदेशी कंपनीच्या दारुची विक्री करीत आहे.
त्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकातीत पोलीस अधिकारी व अंमलदार हे वेशांतर करुन त्या ठिकाणी दोन टिम तयार करून सापळा रचून थांबले होते. सदर प्रकाराची खात्री होताच त्या ठिकाणी छापा टाकला असता बेकायदेशीर गांजा तसेच दारू विक्री करताना सापल्याने अंबिका गरूड या महिलेस ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत ४ लाख ३ हजार ९०४ रूपये किंमतीचा हिरवट तापकीर रंगाचा पाने फूले बिया-बोंडे असलेला २५ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला. तसेच १ लाख १२ हजार ९०० रूपये रोख रक्कम आणि १२ हजार ७४२ रूपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बाटल्या असा एकूण ५ लाख ३३ हजार ०४६ रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, सहायक पोलिस निरिक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस हवालार संदिप गवारी, पोलीस नाईक दिपक साबळे, अनिल महाजन, महिला पोलिस नाईक वैष्णवी गावडे, संगीता जाधव, पोलिस शिपाई योगेश तिडके यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group