पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व LBT ENGLISH MEDIUM SCHOOL यांच्या संयुक्त विद्यमाने कै.लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्रशेठ तापकीर यांच्या हस्ते कै.लक्ष्मीबाई तापकीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागरशेठ तापकीर, संचालक मोहनशेठ तापकीर, राजूशेठ पवार, नितीनशेठ पवार, दिपकशेठ चौधरी, शिवाजी तेलंगे,
श्रीमती. लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत वाखारे सर व, केमदारणे सर, रसाळ सर, बल्लाळ सर, अत्तार सर, देव सर माळी सर व शिवाजी भांड आणि सहकारी शिक्षक तसेच कै.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ गारगोटे व रामदास जाधव, संगीता पाटोळे, संदिप भोईटे, सुनीता पाटोळे, सुवर्णा फडतरे, नवनाथ देवकर, भिमराव लगड, शिक्षकेतर कर्मचारी संतोष पानसरे, रेणू वर्मा व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव सागरशेठ तापकीर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group