पिंपरी (Pclive7.com):- उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथे ‘ए टु झेड’ ऑरगॅनिक (नैसर्गिक रसायनमुक्त पदार्थ) दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशन संस्थापक संजय भिसे, अमोल नारखेडे, पुनम नारखेडे, निशांत नारखेडे, श्रीनिवास फिरके, संजय खासने, वनिता खासने, कीर्ती फिरके, अश्विनी धांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बोलताना फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, सध्याच्या काळात जास्त प्रमाणात भेसळ केलेले अनेक प्रकारचे रसायने वापरलेले पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत. व त्या पदार्थांचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. असे भेसळयुक्त पदार्थ शरीरास हानीकारक आहेत. त्यामुळे नैसर्गिक व रसायनमुक्त पदार्थ आपण घेतले पाहिजे. ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर व गुणकारक आहेत. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. कोणतेही आजार होत नाही व चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आजारांपासून दुर ठेवणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे व निरोगी शरीरासाठी भेसळ युक्त रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थांचा वापर कमीत कमी करावा व नैसर्गिक रसायनमुक्त (ऑरगॅनिक) पदार्थांचा वापर करावा असे म्हणाल्या.






















Join Our Whatsapp Group