पिंपरी (Pclive7.com):- दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित केले आहे. ‘राष्ट्रस्वाभिमान, श्रीराम मंदिर निर्माण’, या विषयावर राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.डाॅ चारुदत्त आफळे यांचे व्याख्यान होणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल.
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील सर्व श्रीराम भक्तगण तसेच अमोल थोरात फाऊंडेशन यांच्यातर्फे आयोजन केले आहे. अयोध्या येथे राम मंदिराची उभारणी व्हावी, अशी श्रीराम भक्तगणांची भावना होती. त्याला अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रस्वाभिमान म्हणून ओळख दिली. मंदिर निर्मिती होत असल्याने त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजर आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमोल थोरात यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group