पिंपरी (Pclive7.com):- दहावी- बारावीच्या अभ्यासावरच विद्यार्थ्यांचे करियर अवलंबून असते. त्यामुळे मन लावून अभ्यास करा. नापास झाल्यावर आयुष्यभर खंत राहील. असे उदगार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले.
रोटरी क्लब ऑफ़ पिंपरी टाउनच्या वतीने पोलिसांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी आयडीयल स्टडी मोबाईल ॲपचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौड, क्लबचे माजी अध्यक्ष अनिल नेवाळे, अध्यक्ष सारंग माताडे, चंद्रकांत पाटील, देहूरोड क्लबचे अध्यक्ष डॉ.अतुल कामत आदी उपस्थित होते.
आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले कि, कोरोना काळात पोलीस बांधवांनी काही सुविधा नसताना कर्तव्य पार पाडले. मात्र काही समाजसेवी संस्थांनी आम्हाला कार्य करण्यासाठी अधिक बळ दिले. पोलिसांच्या या कार्यामुळे पोलिसांची समाजामध्ये प्रतिमा उजळून निघाली. रोटरी क्लबने आयडियल ॲप विकसित करून पोलिसांच्या मुलांना शैक्षणिक हातभार लावला आहे.
उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले कि, समाजात परिवर्तन घडून आणायचे असल्यास स्वतःमध्ये बदल घडून आणला पाहिजेत.
अध्यक्ष माताडे म्हणाले कि, आजतागायत पुणे व रायगड जिल्ह्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांनी या ॲपचा लाभ घेतला. राज्यभर ॲपचा प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलकनंदा माताडे यांनी केले तर आभार सचिव संतोष जाधव यांनी केले.






















Join Our Whatsapp Group