पिंपरी (Pclive7.com):- १ जानेवारी २०२१ भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच नववर्षानिमित्ताने सर्वसामान्य जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रामुख्याने स्वावलंबी जीवन जगण्यासाठी माता भगिनींना केंद्र शासन अंतर्गत राज्य शासनाच्या आत्मसन्मान योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रूपये प्रमाणे सुमारे १०० महिलांना व पुरूषांना १० लाख रूपयांचे वाटप उद्योजक प्रविणभाऊ खरात व युवराज दाखले शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक भारतीय लहुजी पँथर यांच्या हस्ते तापकीरनगर या ठिकाणी वाटप करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नवनाथ झाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सचिन लिमकर, सचिन पाटील, भागवत थोरात, बाळु दगडे, राहुल दगडे, सचिन येडके, आनिल पवार, विक्की पोटे, सम्राट पाटील, नदिम शहा, अजय साळुंके, विश्वनाथ दाखले, आनिल जगताप, संगिताबाई तेलंगे, सुकेशनी साठे, सुनिता येडके, केशरबाई येडके, जयश्री येडके, ताईबाई डुकळे, गांदारी दगडे आदी प्रमुख सुमारे शेकडो महिला व पुरूष उपस्थित उपस्थित होते.
महिला भगिनींनी युवराज दाखले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्या बद्दल आभिनंदन व कौतुक केले.






















Join Our Whatsapp Group