पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील पवना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सदाशिव नानासाहेब नाणेकर यांचे (वय वर्षे ६९) अल्पशा आजारामुळे बुधवार दिनांक ३० डिसेंबर रोजी निधन झाले.
सदाशिव नाणेकर यांनी पवना सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषवले होते. पिंपरी गावातील सार्वजनिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. त्यांच्या हसरा स्वभावामुळे मोठा मित्र परिवार होता. नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या बांधकामासाठी मोठा निधी त्यांनी मिळवून दिला होता. स्थानिक स्कूल कमिटीचे ते सदस्य देखील होते.
सार्वजनिक तसेच शैक्षणिक कार्य करताना त्यांनी मोठा मित्रपरिवार बनवला होता. मनमिळावू व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. नाणेकर कुटुंब हे पिंपरीगावातील सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करणारे कुटुंब आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी दि.०८ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता पिंपरीगाव येथील पवना नदीच्या काठावर होणार आहे. ह.भ.प धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांचे प्रवचन यावेळी होणार आहे.






















Join Our Whatsapp Group