पिंपरी (Pclive7.com):- कोरोना जागतिक महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे “पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि बिर्ला हॉस्पिटल” यांच्या संयुक्त विद्यमाने “संत मोनी बाबा आश्रम” गुरूद्वारा, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रक्तदान शिबीर आणि आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर आणि विद्यमान कार्यक्षम नगरसेवक सचिन चिंचवडे, पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संसथापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, पिंपरी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक गरुड, कार्याध्यक्ष निखिल येवले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिनलाड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विरेश छाजेड, पुणे जिल्हा संघटक विनेश भोजे, हवेली तालुका अध्यक्ष सागर पाचर्णे, शहर अध्यक्ष भाग्योदय घुले, शहर उपाध्यक्ष कमलजित मेहता, पुणे जिल्हा युवक संपर्क प्रमुख अभिजित पाटील, प्रविण वाल्हेकर, विशालराजे शिंदे, रुक्मिणीताई धर्मे, अशप्रित सिंग, मोनी बाबा आश्रमचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group