पिंपरी (Pclive7.com):- सालाबादाप्रमाणे दि.१९ ते २० जानेवारी या दरम्यान साजरी होणारी आकुर्डीतील श्री खंडोबाची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करित यंदाची यात्रा श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी मंदिरात सुमारे दीड ते दोन लाख भाविक गर्दी करतात. या यात्रेत हजारो दुकाने असतात, कुस्ती आखाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी बैठकीत घेतला आहे.






















Join Our Whatsapp Group