भोसरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित भोसरी विधानसभेतील रूपीनगर – तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील सहयोनगर, टॉवर लाईन येथे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या अध्यक्षतेखाली व भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रात उत्सवानिमित्त मुलांना भव्य मोफत पतंग वाटप करण्यात आले.
सहयोगनगर, टॉवर लाईन प्रभाग क्र.१२ मध्ये मोफत पतंग वाटप करण्यात आले. या वेळी लहान व मोठे सर्वांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी प्रभाग क्र.१२ चे प्रभाग अध्यक्ष देवेंद्र निकम, शाखा अध्यक्ष सागर सोनटक्के, नामदेव जेडगुले, करण कुचेकर, संकेत चाटसे व इतर मनसैनिक उपस्थित होते. या प्रसंगी लहान मोठ्यांनी पतंग उडवण्याचा खूप आनंद लुटला.





















Join Our Whatsapp Group