पिंपरी (Pclive7.com):- चिखली-कुदळवाडी परिसरात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करा, अशी मागणी पिंपरी युवासेनेने आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखली-कुदळवाडी परिसरात दिवसेंदिवस अनाधिकृत ताबा मारून दररोज पाच ते दहा पत्र्याचे शेड बांधले जात आहे. सदर अनाधिकृत बांधकामाला सर्व सोईसुविधा सरकारी यंत्रणा पुरवत आहे. शहरात इतरत्र ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असताना चिखली-कुदळवाडी परिसरात बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.
यातच पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहराचे विद्रुपीकरण करण्याचे काम करत आहे. तरी चिखली-कुदळवाडी परिसरातील दिवसेंदिवस होत असलेल्या अनाधिकृत भंगाराच्या दुकानदार व दुकानावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी युवासेनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली. ह्यावेळेस नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, प्रतीक्षा घुले, विभाग संघटक नीलेश हाके, मोमीन शेख उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group