पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व खासगी प्रशिक्षण संस्था तसेच इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. तर, उद्याने सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.
महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्गमित करण्यात आलेले सुधारित आदेश खालील प्रमाणे..
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व प्रशिक्षण संस्था (लाईट हाऊस, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था, सरकारी व खाजगी वाचनालये अभ्यासिका इ.) सॅनिटेशन व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सींग) बाबतच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून दिनांक २२.०१.२०२१ पासून सुरु करणेस परवानगी देण्यात येत आहे.
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस सॅनिटेशन व सोशल डिस्टन्सींग बाबतच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधिन राहून दि.२२.०१,२०२१ पासून परवानगी देण्यात येत आहे.
३) प्रशिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लासेस यांना कोविड – १९चा प्रसार प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
४) प्रशिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लासेस यांना कोविड – १९चा प्रसार प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
▪सदर संस्थानी प्रशिक्षणार्थीची प्रवेश करताना थर्मल गनव्दारे नियमित तपासणी करावी,▪मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.
▪सर्व संस्थामधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोविड -१९ साठीची RT-PCR चाचणी करण्यात यावी. सदर संस्थांना प्रवेशव्दारावर तसेच प्रशिक्षण हॉलमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील.▪दोन प्रशिक्षणार्थीमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यात येऊन सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे बंधनकारक राहील.
५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यापुर्वी परवानगी देण्यात आलेली उद्याने सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशातील मार्गदर्शक सूचना व अटीच्या अधिन राहुन सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
६) पिपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशपर्यंत कोविड- १९ च्या प्रतिबंधासाठी वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशांचे, लागू राहतील.






















Join Our Whatsapp Group