पिंपरी (Pclive7.com):- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेत्रचिकित्सा आरोग्यशिबिर व चष्मा औषध वाटप शिबिराचे आयोजन शिवसेना शाखा कृष्णानगर, फुलेनगर, पूर्णानगर, शरदनगर, कोयनानगर आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई – डॉ. शरद चव्हाण, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. कवडे, श्री सदानंद मोरे आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान फुलेनगर यांनी केले.
यावेळी या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १८० नागरीकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.
या शिबिराचे मुख्य संयोजन सचिन प्रभाकर सानप युवासेना समन्वयक पुणे जिल्हा, प्रदीप सकपाळ विभाग प्रमुख भोसरी विधानसभा केले. या शिबिराचे उद्घाटन शिरूर मतदारसंघ महिला संघटिका सुलभाताई उबाळे शिवसेना सहसंपर्कप्रमुख श्री इरफानभाई सय्यद, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख श्री.धनंजय आल्हाट, शिवसेना भोसरी उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, सर्जेराव आबा भोसले, शिवसेना नेते यशवंत कन्हेरे, ज्येष्ठ शिवसैनिक शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, राहुल सर्जेराव, आबा भोसले, शिवसेना संघटक पुणे जिल्हा समन्वयक दादासाहेब नरळे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य विश्वास शिर्के, दीपक साळुंखे, ऋषिकेश जाधव, तांबडं वडेकर आवाले, नितीन जगताप, लक्ष्मण देसाई, मंगेश घाग यांचे सहकार्य लाभले.






















Join Our Whatsapp Group