पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २ मध्ये कुदळवाडी, भैरवनाथ मंदिर या ठिकाणी असणारे महावितरणचे असलेले टॉवर खांब काढावे, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी केली. तसेच त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक मोनोपोल उभारावेत अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांना त्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आलेले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक २ मध्ये कुदळवाडी, भैरवनाथ मंदिर या ठिकाणी असणारी विद्युत व्यवस्था जुनी झालेली आहे. त्याचा नागरिकांनी त्रास होण्याची शक्यता आहे. जुनी झालेली हि विद्युत व्यवस्था बदलणे गरजेचे आहे. महापालिकेने भक्ती शक्ती उड्डाणपुलाजवळ नवीन अत्याधुनिक मोनोपोल उभारले आहेत. त्याच पद्धतीचे मोनोपोल कुदळवाडी, भैरवनाथ मंदिर येथे उभारून द्यावा, अशी मागणी या वेळी दिनेश यादव यांनी केली.
तसेच त्याचा संपुर्ण खर्च महापालिकेने करावा. या परिसरात सध्या असणाऱ्या विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्वरित हे जुने खांब काढून नवीन मोनोपोल बसवून द्यावे, अशी मागणी या वेळी नगरसेवक दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे केली.






















Join Our Whatsapp Group