पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना युवा सेना व सुलभाताई उबाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद अकातसुकी या टीमने पटकवले आहे.
त्यांना स्मुर्ती चिन्ह व रोख २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर उपविजेते पद बी. इलेव्हन या टीम ने पटकविले. त्यांना रोख १४ हजार रुपये व स्मुर्ती चिन्ह देण्यात आले. तिसरा क्रमांक क्रू साईडर या टीमने पटकविला. त्यांना रोख ७ हजार व स्मृती चिन्ह देण्यात आले. तसेच बेस्ट प्लेयर म्हणून रोहित जयसिंघनी, बेस्ट गोल कीपर निखिल दुर्गा, टॉप स्कोरर म्हणून संदेश गडकरी या खेळाडूंना गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांच्या हस्ते झाले. तर या स्पर्धेस शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, खा श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवा सेना जिल्हा आधिकारी सचिन सानप, अनिकेत घुले, कुणाल तापकीर, राहुल गवळी, माजी नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, अनिल सोमवंशी, रावसाहेब थोरात, अंकुश जगदाळे, सतीश मरळ,तुकाराम वारंग सागर लांगे, निलेश मुटके, संजय बोऱ्हाडे, संतोष सौंदणकर, भारती चकवे सुधा स्वामी, दमयंती गायकवाड, स्मिता मोगरे, प्रतिभा शिंदे, जानी भाई सुखदेव गहलोत, अब्दुल आत्तार, सागर शिंदे, या मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे आयोजन एम.एच.१४, एफ.३ ट्रफ. राहुल कड सर यांच्या सहकार्याने युवानेते अजिंक्य रामभाऊ उबाळे यांच्या नेतृत्वाखाली अनिकेत येरुणकर, सार्थक दोषी, स्वप्नील पाटोळे सूरज कदम लोकेश मुचुंडीकर, अमर पवार, गणेश शिंदे कौस्तुभ गोळे, केतन गोळे जुनेद पठाण, अब्दुल कुरेशी, आकाश खरात, सागर मुणगेकर, अनिकेत गायकवाड, संतोष गायकवाड, अनिकेत सपकाळ, यश चतुर्भुज, किरण वाडकर, वैभव सस्ते, चवडाप्पा तलवार, तानाजी शिंदे, सिद्धांत दोषी ओंकार आंबेरकर,सौरभ फडकले, शंतनू खानापुरे, अनिकेत वाघिरे, निखिल पिसे, रियान कुमार यांनी यशस्वी आयोजन केले.
शिवसेना उपविभागप्रमुख गणेश इंगवले शाखा प्रमुख महेश डोके, नारायण कोरवी, आण्णा कुळवडे, नितीन सुपेकर, भरत डोके, अरुण बांद्रे, मच्छिन्द्र महाकाळ, गजानन ढमाले, सुभाष सराफ, शेखर काकडे, भगवान श्रद्धे, आण्णा जुनघरे, मारुती उभे यांनी विशेष सहकार्य केले.






















Join Our Whatsapp Group