पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंच व रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिरा ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविली.
पिंपरीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरांमध्ये १४८ नागरिकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री.म्हाळसाकांत जोशी तसेच नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास स्वामी सर, सुधाकर यादव सर, अशोक कुदळे, मधुकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुदळे, रंजनाताई जाधव, राजेंद्र वाघेरे तसेच रुबी एलकेअर सर्व्हिसेचे डॉ.नविद इस्लाम, मंजुषा लोहोटे, राजश्री हिरेमठ, मयूर, रेश्मा गायकवाड, प्रविण राजाळे, अनुजा इंगळे, ज्योती कुर्हाडे, सुनिल तांबे, अर्चना गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group