सातारा (Pclive7.com):- पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ इनोव्हा आणि स्विफ्ट कारमध्ये भीषण अपघात झाला असून यामध्ये ४ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील तीन पैलवानांचा समावेश आहे. हे तिघेही कात्रज परिसरातील रहिवासी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन कारमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये ४ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महामार्गावर कराड जवळच्या आटके टप्पा येथे हा अपघात झाला असून अपघातग्रस्त एक मोटार कोल्हापूरवरुन पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने पुढे असणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढील मोटार पलटी झाली.
या भीषण अपघातात दोन्ही मोटारीतील मिळून ४ जण ठार झाले आहेत. यातील जखमींना कराडच्या कृष्णा हॅास्पिटल येथे दाखल करणात आले आहे. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. घटनास्थळी महामार्ग पोलीस तसेच कराड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.






















Join Our Whatsapp Group