पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधील शाहूनगर संभाजीनगर लिंकरोड येथे ‘कुलगुरू जनआरोग्यम्’ जेनेरीक मेडिसिन स्टोअर स्वस्त जनऔषधी सेवा या जेनेरीक औषधीच्या दुकानाचे उद्घाटन डॉ. गिरीशजी आफळे (मा. संघचालक पि. चि. जिल्हा रा.स्व.संघ) यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी नरेशजी गुप्ता (मा. संघचालक देहूगट रा.स्व. संघ ), विलासजी लांडगे (जिल्हा कार्यवाह पिं.चिं.जिल्हा.रा.स्व.संघ), प्रमुख उपस्तिथी बाळासाहेब पुलाटे (सीईओ.जनआरोग्यम् जेनेरीक प्रा. लि), अभिजीतजी पाटणकर (डायरेक्टर,जनआरोग्यम् जेनेरीक प्रा.लि), सुभाषजी शेळके (डायरेक्टर, जनआरोग्यम् जेनेरीक प्रा.लि), अमित सातपुते (एरिया बिजिनेस हेड पीसीएमसी), सचिन साखळकर (एरिया बिजिनेस हेड पीसीएमसी), तसेच प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका अनुराधा गोरखे उपस्थित होत्या.
आता लोकांचे मेडिकल खर्च खूपच वाढले आहे. त्यामुळे लोकांना परवडेल अश्या किंमतीत म्हणजेच ३० ते ७० टक्के स्वस्त दरात औषधी मिळाली या हेतूने चिखली येथील कुलकर्णी परिवाराने हे दुकान सुरु केले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या स्वर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group