पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभाराविरोधात मनसेने आज (दि.०३) पिंपरीत आंदोलन केले. मनसेचे शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
यावेळी महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, जनहित पक्ष अध्यक्ष राजू भालेराव, सचिव रूपेश पाटेकर, सचिव अनिकेत प्रभू, उपशहर अध्यक्ष बाळा दाणवले, उपशहर अध्यक्ष विशाल मानकरी, उपशहर अध्यक्ष राजू सावळे, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, अंकुश तापकीर, मयूर चिंचवड, अनिता पांचाळ, सीमा बेलापूरकर, श्रद्धा देशमुख, सुजाता काटे, सोनाली जम, स्नेहल बांगर, सुरज सकट, निलेश नेटके, आकाश लांडगे, सुधीर जम, नितीन सूर्यवंशी, अक्षय नाळे, सुमित कलापुरे, मिलींद सोनवणे, रोहन पलांडे, शैलेश पाटील, नारायण पटरे, पांडुरंग पाटील, के के कांबळे, सचिन मिरपगार, रोहीत काळभोर, प्रतीक शिदे, प्रवीण माळी, अजय आडगळे, सिद्धेश सोनकवडे, राजेश अवसरे, यश कुदळे, अनुष महाजन, अमर माळी, नितीन पंडित आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
सचिन चिखले म्हणाले, कृषी अधिभार गाजर आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ जनतेचे कंबरडं मोडणारी आहे. कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचेही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं असेल तरी सर्वसामान्यांना झटका देणारी ही बातमी आहे.
कारण अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल दर वाढीतून सूट मिळून वाढीव दर कमी होऊन जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावून पेट्रोल डिझेलचे आत्ताचे दर कायम राहणार असल्याचेच केंद्र सरकारने सूचित केले आहे. हे सगळे कृषी अधिभार या गोंडस नावाखाली होणार आहे.
त्यातही दुर्देवाने वरील अधिभार जर छुप्या पद्धतीने लागू झाला तर पेट्रोलियम पदार्थचे दर १०० रुपयांच्या पलीकडे जातील. परिणामी, मोठ्या प्रमाणावर महागाई वाढेल. त्यामुळे मनसेने आज कृषीअधिभाराच्या गोंडस नावाखाली पेट्रोलियम पदार्थ १०० पार नेण्याची पूर्वतयारी करणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन केले.






















Join Our Whatsapp Group