पिंपरी (Pclive7.com):- चिखली-आकुर्डी रस्त्यावर केशवनगर नाला ते सत्संग रस्त्याच्या कडेला ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे तळवडे वाहतूक विभागांतर्गत चिखली-आकुर्डी रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.
चिखली गाव चौकाकडून साने चौकाकडे जाणारी वाहतूक चिखली गाव चौक ते पंचवटी नेस्ट हाऊसिंग सोसायटी केशवनगर नाल्यापर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.
या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग असलेल्या पाटील नगर चौक ते सोनवणे वस्ती रोड मार्गे सत्संग समोरून साने चौकाकडे जाता येईल. तसेच साने चौकाकडून चिखली गावाकडे येणारी वाहतूक ही सत्संग समोरून सोनवणेवस्ती रस्त्याने पाटीलनगर चौक मार्गे चिखली गावात जाता येईल.






















Join Our Whatsapp Group