पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मालमत्तांवर करसंलन विभागाच्या वतीने कर आकारणी केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात सध्या ५ लाख ३० हजार २७८ मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडते. डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या दोन महिन्यांमध्ये करसंकलन विभागाने रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न कमावले आहे. या दोन महिन्यांत तब्बल ९१ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. परिणामी शहरातील मालमत्तांमध्ये वाढ झाली आहे. सन २०१० मध्ये शहरातील मालमत्तांची आकडेवारी २ लाख ८८ हजारांवर होती. सन २०१५ मध्ये शहरातील मालमत्ता ४ लाख ७ हजारांवर पोहचल्या. तर ऑगस्ट २०२० अखेर शहरात ५ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये या मालमत्तांच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीत ९१ कोटी रुपयांची भर पडली आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये २६ कोटी, डिसेंबर २०१९ मध्ये ३१ कोटी तर यावर्षी म्हणजेच डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४८ कोटी रुपयांचा करभरणा झाला आहे. तर जानेवारी २०१८ मध्ये ३८ कोटी, २०१९ मध्ये २९ कोटी, २०२० मध्ये १५ कोटी तर जानेवारी २०२१ मध्ये ४३ कोटी रुपयांची भर पालिकेच्या तिजोरीत पडली आहे. या दोन महिन्यांच्या काळात ९१ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. तर या अर्थिक वर्षामध्ये १ फेब्रुवारी अखेर ३५५ कोटी रुपयांचा भरणा विविध करसंकलन कार्यालयांमध्ये झाला असल्याचे उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group