पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील राष्ट्रवादीतील ४ सदस्यांपैकी २ सदस्यांची मुदत पूर्ण झाली आहे. त्या रिक्त होणार्या दोन जागांसाठी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.
स्थायी समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार सदस्यांपैकी दोन सदस्य मुदत पूर्ण झाल्याने निवृत्त होत आहेत. जे सदस्य निवृत्त होणार असतील त्या सदस्यपदाच्या जागा भरण्यासाठी स्थायी समितीच्या नविन सदस्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुकांनी त्यांचे अर्जदि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात आणून द्यावेत असे आवाहन राजू मिसाळ यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group