पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहायक आयुक्तपदी व्यंकटेश दुर्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभागाची कामगिरी सोपविण्यात आली आहे. तसे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
यापूर्वी ते वसई विरार महापालिकेमध्ये काम करत होते. तेथून त्यांना पिंपरी चिंचवड महापालिका सहायक आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. वसई विरार महापालिकेमधून दुर्वास यांना १८ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेत रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
त्यानंतर २५ जानेवारीला त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त या पदावर रुजू होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार त्यांनी महापालिकेमध्ये सहायक आयुक्त गट अ पदावर रुजू करून घेण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group