पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील रहिवशी असलेल्या क्षमा धुमाळ यांनीअमेरिकेच्या ह्याम्पडेन युनिव्हर्सिटीतून मेकअप आणि ब्युटी या विषयावर पीएचडी मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मागील वीस वर्षापासून ब्युटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षमा धुमाळ या शहरातील महिला आहेत. ज्यांनी या क्षेत्रात पीएचडी मिळवली आहे. या क्षेत्राची आवड असल्यामुळे चिंचवड येथे स्व्तःचे क्लिओपात्रा ब्युटी स्कूल सुरु केले आहे. मागील आठ वर्षापासून हे इन्स्टिट्यूट यशस्वीपणे चालू आहे. या इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून अनेक विध्यर्थिनीना प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय उभे करण्यास त्यांनी मदत केली आहे.
याबाबत क्षमा धुमाळ म्हणाल्या, लहानपणा पासून शिक्षणा एवजी या क्षेत्राची आवड होती. त्यामुळे यामध्येच खोलवर माहिती शिक्षण घेतले. यामध्येच माझे करिअर केले. मला माझ्या मनासारखे काम करायला मिळाले यातच खुप मोठे समाधान मिळाले, त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकले.






















Join Our Whatsapp Group