पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ह-प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे सभापती व नगरसेवक हर्षल ढोरे आणि सांगवीतील बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी (दि.१६) प्र. के. अत्रे यांनी लिहिलेले आणि कित्येक दशकांपासून रंगभूमीवर धुमाकूळ घालणाऱ्या “मोरूची मावशी” या प्रसिद्ध विनोदी नाटकाचे आयोजन केले आले आहे.
सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोर सायंकाळी ६ वाजता या नाटकाला सुरूवात होणार आहे. या नाटकामध्ये प्रसिद्ध अभिनेते भारत जाधव हे मावशीच्या भूमिकेत असणार आहेत.
सामान्यपणे प्रथमतः नाटक रंगभूमीवर येतं आणि नंतर त्याचा चित्रपट होतो. पण पहिले चित्रपट आणि नंतर नाटक असा उलट प्रवास झालेलं सुपरहिट नाटक म्हणजे ‘मोरुची मावशी’ प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर भरत जाधव यांनी मावशीच्या भूमिकेचं शिवधनुष्य पेललं आहे. ही भूमिका म्हणजे एक प्रकारे भरत जाधव यांनी विजय चव्हाण यांना वाहिलेली अनोखी आदरांजली.
पुरुषांनी चित्रपटात स्त्री भूमिका साकारणं आणि नाटकात स्त्री भूमिका रंगवणं यात फरक आहे. चित्रपट अनेक गोष्टी संकलित करतो. पण नाटकासारख्या जिवंत कलेत हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने सातत्यपूर्ण स्त्री भूमिका साकारणं अवघड काम. जुन्या मराठी संगीत नाटकातील स्त्रीपार्टींना नवा आयाम देत रंगमंचावर धुमाकूळ घालणारी मोरूची मावशी म्हणजे अशा भूमिकांमधलं सोनेरी पानच! रंगभूमीवरचे हे सोनेरी पान आता आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवीकरांना पाहण्याची पर्वणी प्राप्त झाली आहे.






















Join Our Whatsapp Group