पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार ५८६ कोटी ३५ लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार ११२ कोटी १ लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समितीला आज (दि.१८) सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे हे होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ३९ वे अंदाजपत्रक आहे.
सभापती संतोष लोंढे यांनी बुधवार दि.२४ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्थसंकल्पाच्या अभ्यासाकरिता सभा तहकूब केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सन २०२१-२२ चे अंदाजपत्रक सादर केले असून महापालिकेचे हे ३९ वे अंदाजपत्रक आहे. या आर्थिक वर्षात र.रु. ५२३२.५७ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल हे अपेक्षित धरुन अंदाजपत्रक मा.स्थायी समिती मार्फत महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात र.रु. ५५८८.७८ कोटी (आरंभिच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे. व त्यात प्रत्यक्षात खर्च र.रु. ५५८६.३५ कोटी होईल व मार्च २०२२ अखेर र.रु. २.४३ कोटी इतकी शिल्लक राहील. १ हजार ५२३ कोटी २३ लाख रूपयांच्य केंद्र व राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांच्या समावेशासह एकूण ७ हजार ११२ कोटी १ लाख रूपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला.
या अंदाजपत्रकाची खास वैशिष्ट्ये
१) म.न.पा.च्या विकास कामांसाठी र.रु.१६३०.७३ कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद केली आहे.
२) क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी तरतूद.
१. अ क्षेत्रीय कार्यालय – र. रु. ३२.३२ कोटी
२. ब क्षेत्रीय कार्यालय – र. रु. ६८.०२ कोटी
३. क क्षेत्रीय कार्यालय – र. रु. ७०.५५ कोटी
४. ड क्षेत्रीय कार्यालय – र. रु. २५.२७ कोटी
५. इ क्षेत्रीय कार्यालय – र. रु. ४२.९४ कोटी
६. फ क्षेत्रीय कार्यालय – र. रु. २९.४७ कोटी
७. ग क्षेत्रीय कार्यालय – र. रु. २४.०७ कोटी
८. ह क्षेत्रीय कार्यालय – र.रु. ३८.८९ कोटी
३) विशेष योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या लेखाशिर्षावर र.रु.१२३२.३४ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
४) शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद र.रु.१२१४.२९ कोटी. ५) जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद र. रु. ५३.३७ कोटी.
६) महापौर विकास निधीसाठी तरतूद र. रु. ८.५५ कोटी.
७) दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद र. रु. ३८.५६ कोटी.
८) पाणी पुरवठा विशेष निधी र. रु २५० कोटी.
९) PMPML करीता अंदाजपत्रकात र. रु. २३८.२१ कोटींची तरतूद.
१०) नगररचना भू-संपादना करीता र. रु. १५० कोटी तरतूद.
११) अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरीता र. रु. ४ कोटी तरतूद.
१२) स्वच्छ भारत मिशनसाठी र. रु. १ कोटी तरतूद.
१३) स्मार्ट सिटीसाठी र. रु. १०० कोटी तरतूद.
१४) मा.प्रधानमंत्री आवास योजना र. रु. ४९ कोटी तरतूद.
१५) अमृत योजनेसाठी र.रु. ६३.८३ कोटी तरतूद.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात तरतूद उपलब्ध करून देण्यात येणारे महत्वाचे उपक्रम
● प्रभाग क्र.२१ पिंपरी वाघेरे येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे.
● प्रभाग क्रमांक २ बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारणे.
● प्रभाग क्र. २ मधील चिखली जाधववाडी गट नं ६०६ आरक्षण १/४४६ येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणे.
● प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी येथील ताब्यात येणाऱ्या गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधणे.
● थेरगाव सर्व्हे नं. ०९ येथे बहुउद्देशीय इमारत उभारणे.
● प्रभाग क्र. ४९ थेरगाव बापूजीबुवा नगर येथील सव्वें नं. ०९ मध्ये दवाखाना इमारत बांधणे.
● पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिलीप वेंगसरकर अकादमीच्या पॅव्हेलियनचे उर्वरित काम करणे.
● प्रभाग क्र. २४ थेरगाव येथे डी.पी. आरक्षण क्र. ६२८ येथील खेळाचे मैदान विकसित करणे.
● लोहगाव विमानतळाला जोडणारा चऱ्होलीतील ३०.०० मी. रस्त्याचे भूसंपादन पुर्ण करणे.
● पुणे – नाशिक रस्ता भूसंपादन पुर्ण करणे.
● मोशी येथील स.नं.१४४ (जुना-४४५) आरक्षण क्र.१/२०४ येथे बहुउद्देशिय स्टेडीयम बांधणे.
● प्रभाग क्र.१ चिखली येथील गट क्र.१६५३ व १६५४ (गायरान) मधील आरक्षण क्र.१/८८ येथे हॉस्पीटल बांधणे.
● सांगवी-किवळे रस्त्यावरील पुनावळे रावेत हद्दीवर पवना नदीवर बास्केट ब्रिज शेजारी समांतर पूल बांधणे.
● सांगवी – बोपोडी मुळा नदीवरील पुल बांधणे.
● बोपखेल येथे मुळा नदीवरील पूल बांधणे.
● नाशिक फाटा ते वाकड फ्री वे बांधणे.
● नाशिक महामार्गावरील पांजरपोळ चौक ते आळंदी रस्त्यापर्यंतचा रस्ता विकसीत करणे.
● नाशिक फाटा ते वाकड या रस्त्यावर सुदर्शननगर चौक पिंपळे गुरव येथे ग्रेड सेपरेटर बांधणे.
● विशालनगर पिंपळे निलख येथील व आकुर्डी रेल्वे स्टेशन ला जोडणारे परीसरातील ४ रस्ते १८ ते २४ मी. रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट संकल्पनेनुसार विकसित करणे.
● भोसरी पुलाखाली व एम्पायर इस्टेट पुलाखालील परीसर अर्बन स्ट्रीट नुसार विकसित करणे.
● तळवडे व हिंजवडी आयटी पार्क कडे जाणाऱ्या वाल्हेकरवाडी ते ताथवडे पर्यंतचा स्पाईन रस्ता विकसित करणे व पवना नदीवर पुल बांधण्याचे नियोजन आहे.






















Join Our Whatsapp Group