पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2017 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत भोसरी पोलीस ठाण्याचे अंमलदार निवास रोकडे राज्यातून 55 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल युवासेना पिंपरी विधानसभा यांच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
पिंपरी युवासेनेचे निलेश हाके, पोलीस नाईक रवींद्र जाधव, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भुरे, मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, अविनाश जाधव, अक्षय गायकवाड, दीपक साळवे, रोहित गोरे उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2017 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात निवास रोकडे यांनी यश संपादन केला. कोरोना काळातही त्यांनी खडतर सेवा बजावली.
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे या छोट्याश्या गावातील निवास रोकडे 2010 मध्ये नवी मुंबई पोलीस दलात भरती भरती झाले. 2019 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात त्यांची बदली झाली. सध्या ते भोसरी पोलीस स्टेशन येथे अंमलदार म्हणून कार्यरत आहेत.
रोकडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण साडे हायस्कुल येथे झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथिल भारत हायस्कुल अँड जुनिअर कॉलेजमधून पूर्ण केले.
शिक्षणासाठी आई वडिलांनी घेतलेलया कष्टाची जाणीव ठेवत त्यांनी एमपीसी परीक्षेत यश मिळवले आहे. ‘पीएसआय’पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मुळगाव साडे, जेऊर तसेच संपूर्ण करमाळा तालुक्यातून त्यांचे कौतूक होत आहे.






















Join Our Whatsapp Group