पिंपरी (Pclive7.com):- संकल्प वेल्फेअरच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज”यांच्या जयंतीनिमित्त गोरगरिबांना पुरण पोळीचा मायेचा घास भरवण्यात आला.
मराठमोळ्या पद्धतीने अन्नदानाचे वाटप करण्यात आले. या योगदानावेळी सुजित पोंगडे, आकाश वाघमारे, महादेव पवार, वृषभ कांबळे, संग्राम बनसोडे, स्वराज बोबडे, शुभम रोकडे, प्रसाद गौंड, समीर खानापुरे, प्रविण काटे, विल्यम चांदणे आदी सभासद उपस्थित होते. संकल्प वेल्फेअरच्या वतीने अशा उपक्रमाव्दारे शिवजयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.
सुजित पोंगडे म्हणाले की, संकल्प वेल्फेअरच्या वतीने गरजु गोरगरिबांना आनंदाचे दोन घास भरवण्याचा संकल्प “छत्रपती शिवाजी महाराज”यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला. अश्या कृतीतून नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवण्याचे कार्य करण्यात आले.























Join Our Whatsapp Group