पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस, राष्ट्रवादी डॉक्टर सेल, राष्ट्रवादी ग्राहक सेल आणि जगदगुरू बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला आरोग्य तपासणी शिबिरात बाराशे महिलांची तपासणी करण्यात आली. मोशी येथील शिवाजीवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सूर्यकांत गवळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, निरीक्षक उज्वला शेवाळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका मंदा आल्हाट, उत्तम आल्हाट, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, माजी सरपंच हरिभाऊ सस्ते, अतिश बारणे, उपसरपंच विठ्ठल कामथे, नितीन सस्ते, बाळासाहेब सस्ते, राजकुमार सस्ते, कविता आल्हाट, संगीता आहेर, रूपाली कोंडे, आयोजक राष्ट्रवादी ग्राहक सेलचे शहर कार्याध्यक्ष गणेश सस्ते, मनिषा गटकळ, सपना घाडगे,जगद्गुरु महिला गटाच्या अध्यक्षा सोनाली सस्ते आदी उपस्थित होते.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. मोशी परिसरातील महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या हेतूने या शिबिराचे अयोजन केले असल्याची माहिती आयोजक गणेश सस्ते यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सस्ते यांनी केले. कविता आल्हाट यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार सोनाली सस्ते यांनी यांनी मानले. यावेळी उज्वला शेवाळे, वैशाली काळभोर, सूर्यकांत गवळी, संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे यांनी महिला आरोग्याविषयी आपले विचार मांडले.























Join Our Whatsapp Group