पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील एकतानगर येथे अस्तित्व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन अस्तित्व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. नम्रता बाळासाहेब गुरव यांनी केले होते. या कार्यक्रमात एकतानगर मधील छोटे बालगोपाल व माताभगिनींचा उत्साहात मोठा सहभाग लाभला. लहान बालगोपालांना इतिहासाची ओळख व्हावी यासाठी नम्रताताईंनी ‘इतिहासाची प्रश्नमंजुषा’ घेतली.
या कार्यक्रमात विमल कदम, शैला स्वामी, वृषाली कुभांर, गौरी पाटील या माताभगिनींचाही सहभाग होता. कार्यक्रमाच्या शेवटी छोट्या बालगोपालांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.























Join Our Whatsapp Group