पिंपरी (Pclive7.com):- संपुर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंटस् को- ऑप. बँक लिमिटेडच्या जनसंपर्क संचालक पदी रजनी जातेगांवकर यांची तर उपाध्यक्ष पदी हरिश लोढा यांची झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत बहुमताने निवड करण्यात आली.
गेल्या तीन दशकांपासून सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रजनी जातेगांवकर या २० वर्षांपासून नामको बँकेच्या संचालक पदी निवडून येत आहेत.
संपुर्ण बँकिंग क्षेत्र कोरोनाच्या काळात आणि त्यातही सहकार क्षेत्र आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. नामको सभासदांना रोजच्या बँकिंग सेवे बरोबरच गुंतवणूक, इन्शुरन्स या सर्व सेवा एकाच छत्राखाली देण्याचा मानस या प्रसंगी जातेगांवकर यांनी बोलून दाखविला. जनसंपर्क संचालक या पदाच्या माध्यमातून बँक सेवा सभासदांच्या अधिक जवळ घेऊन जाण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
बँक वाढीसाठी सर्व शाखाशी सुसंवाद साधुन सर्व सभासद बँक शाखा आधिकारी आणि बँक प्रशासन ह्यांच्यातील संवाद अधिक सहज आणि सकारात्मक करण्यासाठी नामकोचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष हरिष लोढा, ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, वसंत गिते, शोभा छाजेड, हेमंत धात्रक आणि इतर संचालक या सर्वांच्या सोबतीने अधिक क्रियाशीलता आणण्यासाठी कटिबद्ध असणार असे त्यांनी निवड प्रसंगी नमूद केले.























Join Our Whatsapp Group