पिंपरी (Pclive7.com):- स्वप्न स्वराज्याचे, भैरवनाथ प्रतिष्ठान, रहाटणी व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने कै. आण्णासाहेब नानासाहेब नखाते यांच्या स्मरणार्थ दिला जाणाऱ्या ‘उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार सन २०२१’ या पुरस्कारासाठी पै.राजू बाबासाहेब हिप्परकर यांची निवड करण्यात आली आहे. रहाटणी येथील थोपटे मंगल कार्यालय या ठिकाणी आज मंगळवारी सायंकाळी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पैलवान राजू बाबासाहेब हिप्परकर, हा रहाटणी येथील रहिवाशी आहे. वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलनात तो असतो. 61 किलो युवा महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक, 61 किलो महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये कास्य पदक व 65 किलोमध्ये तीन वेळा, ज्युनिअर नॅशनल, 65 किलो नॅशनल हिंदकेसरी पदक, 65 किलो दोन वेळा युनिव्हर्सिटी नेशनल स्पर्धेमध्ये पदक, 61 किलो पुणे महापौर स्पर्धेमध्ये कास्यपदक, शिवशक्ती मल्लसम्राट किताबाचे मानकरी, 65 किलो काळभैरवनाथ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अशी आजवरची राजूची कामगिरी आहे. याच सर्व कामगिरीची दखल घेत यावर्षी उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कार सन २०२१ यासाठी राजूची निवड करण्यात आली आहे.























Join Our Whatsapp Group