पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथील महापालिकेचा बस थांबा स्थलांतरित करावा, अशी मागणी चिखलीतील लोकप्रतिनिधींद्वारे करण्यात आली आहे. नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, संतोष मोरे आणि पांडुरंग साने यांनी पीएमपीचे विभागीय व्यवस्थापक संतोष माने यांच्याकडे मागणीचे निवेदन सादर केली आहे.
मौजे चिखली येथे संचलनात असलेली मार्ग क्रमांक ३२३ चिखली ते मनपा बस तसेच बस क्रमांक ३२६ चिखली ते पिंपरी हा मार्ग पाटीलनगर चिखली येथील श्री नागेश्वर विद्यालय हायस्कूलपर्यंत वाढविण्यात यावा. याठिकाणी असलेल्या धर्मराजनगरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महापालिकेच्या संतपीठ या प्रकल्पाचे काम चालू असून हा मार्ग विस्तारीकरणामुळे या प्रवाशांची सोय होईल.
तसेच सद्यस्थितीत चिखलीगावातील छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात नेहमीच काही ना काही कारणास्तव अनेक छोटी मोठी वाहने उभी असतात. त्यामुळे बसेसला अडथळा निर्माण होतो. व वाहतूक कोंडी होत असते. ही बाब नित्याचीच झाली असून त्यावर उपाय म्हणून या मार्गाचे विस्तारीकरण करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी नगरसेवक कुदंन गायकवाड, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, दिनेश यादव, पांडुरंग साने हे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group