पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नरिमन पाॅईंट मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी पटोले यांचा महात्मा फुले पगडी, ज्ञानेश्वरी व उपरने देऊन युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पटोले यांची भेट घेऊन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा केली.
आगामी काळात युवकांवरच मोठी जबाबदारी देऊन अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, धम्मानंद प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अविनाश चौधरी, शेखर शिंदे आणि मंगेश कदम आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group