पिंपरी (Pclive7.com):- तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आज (दि.२) बंद राहणार आहे.
अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी व कोरोना रुगणांचा वाढता आकडा यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा आदेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय प्रशासनाने काढला आहे. अशी माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली.
वर्षातून केवळ दोन अथवा तीन अंगारकी चतुर्थी येत असल्याने एक लाख भाविक श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथे येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त येत असल्याने यात्रेचे स्वरुप आलेले असते. कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने मोरया गोसावी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंदिर बंद राहणार असले तरी नियमित चालत आलेले धार्मिक पूजा, अर्चा, नैवद्य सुरू राहणार आहे. चतुर्थी दिवशी मंदिर बंद राहणार असल्याने भावीकांनी मंदिर अथवा मंदिर परिसरात न येण्याचे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्ट व चिंचवड पोलिस स्टेशनकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group