पिंपरी (Pclive7.com):- मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. यासाठी प्रशासनाचे चुकीचे नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करत कोरोनाला रोखण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.
यासंदर्भात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
याविषयी बोलताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, आत्तापर्यंत शहरामध्ये जवळपास १ लाख कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. तर २५०० पेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा मेहनत घेत असली तरी, कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसून येत नाही. मागील आठवड्याभरात शहरामध्ये दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. झपाट्याने वाढत असलेल्या या रुग्णासंख्येमुळे शहरातील नागरिकामध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सध्याचा प्रशासनाचा चुकीचा कारभार पाहता यासाठी सक्षम अधिकार्याची निवड करणे गरजेचे असल्याचे नगरसेवक वाघेरे यांनी निवेदनात म्हंटले आहे.






















Join Our Whatsapp Group