पिंपरी (Pclive7.com):- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पातील सदनिकांच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी मोहिम सोमवार (दि.०८) पासून सुरु करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
या सोडतीमध्ये विजेता झालेल्या लाभार्थ्यांनी मूळ (Original) कागदपत्रे म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवाशी दाखला, भाडे करारनामा इ. व नियमानुसार इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी महापालिकेने केल्यास लाभार्थ्यांना ते सादर करावे लागतील.
तसेच लाभार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेला उत्पन्नाचा दाखला याची तपासणी होणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची महापालिका हद्दीत कोणतीही मिळकत नाही, याची देखील तपासणी होणे आवश्यक राहील. ज्या राखीव प्रवर्ग मध्ये अर्जदार यांनी अर्ज सादर केला आहे. त्या प्रवर्गाच्या जात प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येईल.
या मूळ निकषाची पुर्तता झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. निकष पुर्तता झाली नसल्यास त्या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येऊन त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील प्रवर्ग निहाय लाभार्थ्यांस योजनेत समावून घेण्यात येणार आहे.
जागतिक महामारी कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे आरक्षणनिहाय नियोजन करुन लाभार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी करण्याकामी बोलविण्यात येणार आहे. रावेत प्रकल्पासाठी ९३४ लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
• दिनांक ०८ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी १ वाजता – अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.८६९ ते ९३४ पर्यंत)
• दिनांक ०८ मार्च २०२१ – दुपारी २.३० ते दुपारी ५.३० वाजता – अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.७४८ ते ८६८ पर्यंत)
• दिनांक ०९ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.४६८ ते ६०८ पर्यंत)
• दिनांक १० मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.६०९ ते ७४७ पर्यंत)
• दिनांक १२ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता –सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१ ते १५५ पर्यंत)
• दिनांक १३ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता –सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी(निवड यादीतील अ.क्र.१५६ ते ३१० पर्यंत)
• दिनांक १४ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता –सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.३११ ते ४६७ पर्यंत)
बोऱ्हाडेवाडी प्रकल्पासाठी १२८८ लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी खाली दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागात उपस्थित रहावे असेही आवाहन करणेत येत आहे.
• दिनांक १५ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.११९८ ते १२८८ पर्यंत)
• दिनांक १६ मार्च २०२१ –सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१०३१ ते ११९७ पर्यंत)
• दिनांक १७ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.६४५ ते ८३८ पर्यंत)
• दिनांक १८ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.८३९ ते १०३० पर्यंत)
• दिनांक १९ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१ ते २१५ पर्यंत)
• दिनांक २० मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.२१६ ते ४३० पर्यंत)
• दिनांक २१ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.४३१ ते ६४४ पर्यंत)
चऱ्होली प्रकल्पासाठी १४४२ लाभार्थ्यांची निवड झालेली असून त्यांनी खाली दिलेल्या वेळेनुसार कागदपत्रे तपासणीकामी झोपडपट्टी निर्मुलन वपुनर्वसन विभागात उपस्थित रहावे असेही आवाहन करणेत येत आहे.
• दिनांक २२ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१३४२ ते १४४२ पर्यंत)
• दिनांक २३ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.११५५ ते १२४७ पर्यंत)
• दिनांक २४ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१२४८ ते १३४१ पर्यंत)
• दिनांक २५ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.७२२ ते ८६६ पर्यंत)
• दिनांक २६ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.८६७ ते १००९ पर्यंत)
• दिनांक २७ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१०१० ते ११५४ पर्यंत)
• दिनांक २८ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१ ते १८० पर्यंत)
• दिनांक २९ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.१८१ ते ३६१ पर्यंत)
• दिनांक ३० मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.३६२ ते ५४१ पर्यंत)
• दिनांक ३१ मार्च २०२१ – सकाळी ११ ते दुपारी ५ वाजता – सर्वसाधारण प्रवर्ग (General Category) प्रवर्गातील लाभार्थी (निवड यादीतील अ.क्र.५४२ ते ७२१ पर्यंत)






















Join Our Whatsapp Group