पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वकिल बंधु व भगिनींना मोफत कोविड प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. पांडुरंग शिनगारे व खजिनदार अँड. हरिश भोसुरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी दिवाणी फौजदारी न्यायालयामध्ये दररोज दैनंदिन कोर्ट कामकाजासाठी साधारणता एक ते दोन हजार वकील बंधू-भगिनी येत असतात. त्याच प्रमाणामध्ये न्यायालयीन कर्मचारी पोलिस व पक्षकार ये-जा करीत असतात.
वकील बांधवांना कोर्ट कामकाज करताना बहुतांशवेळा गर्दी मध्ये काम करावे लागते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत आहे. म्हणून वकील वर्गालाही कोरोना प्रतिबंध लस मोफत मिळाली अशी मागणी सर्व वकिलांकडून करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group