पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलीस ठाण्याकडून हद्दीतील हॉटेल ‘रूड लाऊंज’वर कडक कारवाई करण्यात आली आहे. कडक निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीलांनी छापा टाकून हॉटेल सिलबंद केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि.१६) रोजी इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या हॉटेल रूड लाऊंजवर पोलीसांनी छापा टाकला. त्यावेळी तेथे हॉटेल चालकाने इतरांना हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देवून प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का पिण्याचे फ्लेवर तसेच हुक्का पिण्यासाठी लागणारे इतर साहित्य पुरवून हुक्का पार्लर हे शर्तीपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याचे आढळून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या कडक निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल सदरचे हॉटेल सिलबंद करण्याची कारवाई पोलीसांनी केली असून हॉटेल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परि-२ आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरिक्षक सागर काटे, पोलीस उपनिरिक्षक रविंद्र मुदळ, पोलीस अंमलदार योगेश शिंदे, संतोष शिंदे, सचिन सानप तसेच हिंजवडी ग्रामपंचायतीकडील कर्मचारी आतिष साखरे, लक्ष्मण ढवळे, गणेश मांजरे, संतोष तुपे यांनी केलेली आहे.






















Join Our Whatsapp Group