पिंपरी (Pclive7.com):- कोरोना फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तरीही पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मनपा हद्दीसाठी (दि.१७) रोजी सुधारित आदेश जारी केला आहे.
● महापालिकेने जारी केलेले सुधारित आदेश..
▪१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणा-या कंपन्यांना परवानगी दिलेली आहे अश्या कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकान केवळ त्याच कारणासाठी सुरु ठेवता येतील. इतर किरकोळ विक्री करता येणार नाही त्यांनी Point To Point विक्री करावी.
▪२) खालील आस्थापनावरील कर्मचा-यांना कोविड-१९ (RTPCR / RAT) चाचणी करणेपासून सूट देण्यात येत आहे.
★ ई-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी
★ हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांचे कर्मचारी तसेच त्यांचे मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी
★ खाजगी वाहतूक करणारे वाहन चालक/मालक
★ दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालीन मासिके, साप्ताहिक इ. ची छपाई व वितरण करणारे कर्मचारी
★ घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणा-या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस/नर्स
★ तथापी त्यांनी भारत सरकारद्वारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
▪३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खानावळी (मेस) या फक्त पार्सल सेवेसाठी सर्व दिवस सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०८.०० या वेळत सुरु राहतील.
▪४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलीव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत सुरु राहतील.
▪५) चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
▪६) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळा निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
केंद्र सरकार/महाराष्ट्र शासन/पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यत लागू राहतील असे महापालिका आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group