पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते पिंपरी चिंचवडमध्ये येऊन लस टोचून घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (दि.१०) दुपारी भोसरी येथील रुग्णालयात लस घेतली.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे जुने भोसरी रुग्णालय येथे प्रकाश आंबेडकर यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह भोसरी हॉस्पिटलच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर त्यांच्यासोबत होते. प्रकाश आंबेडकर यांनी लस घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.





















Join Our Whatsapp Group