पिंपरी (Pclive7.com):- चिखली मोरे वस्ती येथील नवदुर्गा सखी मंच आणि पांडाभाऊ साने युवा मंचाच्या वतीने मोरेवस्ती-साने चौक भागातील नागरिकांसाठी मोफत सुरू केलेल्या रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला. मोरे वस्तीतील अंगणवाडी चौकात सोमवारी हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका ‘फ’ प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक कुंदन गायकवाड, स्विकृत नगरसेवक संतोष मोरे, माजी नगरसेवक सुनिल लोखंडे, स्विकृत नगरसेवक सागर हिंगणे, भाजपा शहर चिटणीस रविंद्र जांभुळकर, तुकाराम जाधव, संतोष मोरे, रमेश सांगडे, गणेश अवचिते, दिगंबर साने, कुलदीप साने, अभिजित साने, रविंद्र साने, गणेश साने, आनंद साने, भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने, नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपाली साने आणि मोरेवस्ती भागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी मोरे वस्तीमधील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार लांडगे यांनी पांडा साने व रूपाली साने यांच्या कार्याचे कौतुक केले.
पांडा साने म्हणाले कि, गेल्या एका वर्षापासून आपल्या मोरेवस्ती- साने चौक परिसरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिकांचे अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे किंवा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी निधन झाले.
गेली वर्षभरापासून अनेक नागरिकांचे, माता-भगिनींचे मला आणि रुपाली साने यांना भरपूर वेळा हॉस्पिटल इमेर्जेन्सी संदर्भात फोन यायचे. ज्यामध्ये घरातील कर्ता पुरुष अथवा स्त्री कोरोना पॉझिटिव्ह असायची. अशा वेळेस पेशंटला तातडीने हॉस्पिटलला नेता येईल आणि त्याचा अतिरिक्त आर्थिक ताण मोरेवस्ती- साने चौक भागातील बहुसंख्य कामगार वर्गावरती पडू नये, या शुद्ध भावनेने नवदुर्गा सखी मंच आणि पांडाभाऊ साने युवा मंचाच्या वतीने मोरेवस्ती-साने चौक भागातील नागरिकांना मोफत ॲम्बुलन्स सेवा देण्याचे ठरवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार रुपाली साने यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group