पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या गुरूवार दि.२०/०५/२०२१ रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
लस साठा उपलब्ध नसल्यामुळे उद्या गुरूवार दि.२० रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. पिंपरी चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरीकांनी नोंद घेण्यात यावी.
या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद असलेने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका लसीकरण केंद्रावर आज ५८६९ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.