पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या (रविवार दि.३० मे) रोजी ‘कोव्हॅक्सिन’ व ‘कोविशिल्ड’ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार आहे.

त्यानुसार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उद्या दि.३० मे रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि.३० मे रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने उद्या दि.३०/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३३ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’ लसीचे डोस खालील केंद्रावर मिळणार
यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना.
‘कोविशिल्ड’ लसीचे डोस खालील केंद्रावर मिळणार
साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, घरकुल दवाखाना चिखली, रुपीनगर शाळा, प्राथमिक शाळा – ९२ मोरे वस्ती म्हेञे वस्ती, पिं. चिं. मनपा. शाळा खराळवाडी, नेहरुनगर उर्दु शाळा, एस.एस.अजमेरा स्कुल अजमेरा, दिनदयाल शाळा पवना बॅक मागे संत तुकाराम नगर पिंपरी, पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल, नवीन भोसरी रुग्णालय भोसरी, सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल मोशी दवाखाना, छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय दिघी (सी एस एम), पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली,
पिंपळे गुरव माध्यमीक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, शंकुतला शितोळे शाळा वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा पिं. निलख दवाखानाजवळ, पिं. चिं. मनपा शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा कस्पटे वस्ती वाकड, पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव-३३, पिं. चिं. मनपा. शाळा पवनानगर काळेवाडी,
अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिं. चिं. मनपा. शाळा रहाटणी, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, फकीर भाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, मनपा शाळा किवळे, बिजलीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, सेक्टर नं.२९ मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, प्रेमलोक पार्क दवाखानामनपा शाळा वाल्हेकरवाडी.
तसेच उद्या दि.३० मे रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.






















Join Our Whatsapp Group