पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारच्या यशश्वी ७ वर्षपूर्ती निमित्ताने भारतीय जनता पार्टी ओबीसी युवक मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने चिखली येथील विकास अनाथ आश्रमात धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत अनेक अनाथालय मदतीपासुन वंचित राहीली आहेत. समाजात काम करत असताना आपण समाजाच काहीतरी देण लागतो ही भावना मनामध्ये ठेवून ओबीसी युवक मोर्चाचे अध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टिमने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रम प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख वीणा सोनवलकर, नगरसेवक दिनेश यादव भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश रासकर, युवा नेते विकास साने, सरचिटणीस कैलास सानप, योगेश आकुलवार, शंकर लोंढे, अभिषेक कर्पे, योगेश मोरे, सचिन मदने, नफीस खान, शशिकांत पुंड, चेतन पंडित, श्रुतिका पुंड, गोरोबा शेळके, आकाश भालेकर, श्रेयश गुंड, आकाश कळमकर, आदी भाजप ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन साळी सर यांनी केले.






















Join Our Whatsapp Group