पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्याचा वसा लाभलेला युवक नेता अशी बिरुदावली मिळून, गावपातळीवर तळागाळापर्यंत पोहोचून काम करणा-या एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे यांच्या वाढदिवसानिमित्त डोणे येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कारके व उपाध्यक्ष रवि काळभोर यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकता प्रतिष्ठाणच्या डोणे गांवात सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी उद्योजक डी.एस.पांदिलवार उपस्थित होते पवनमावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर, योगेश कारके, रवि काळभोर, रणजित, समिर खिलारे,मल्हारी खिलारी, संदेश चांदेकर, विश्वास चांदेकर व प्रतिष्ठानचे सर्व सभासद उपस्थित होते.
आज पासून गांवामध्ये सुरू झालेले सॕनिटायजरचे वाटप येत्या दोन दिवसात पुर्ण होईल. गावातील विविध उपक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने सहभाग घेतला जातो. यापूर्वी केलेल्या सामाजिक उपक्रमासारखे यापुढेही प्रतिष्ठानच्यावतीने गांवामध्ये सामाजिक व विकासाचे उपक्रम राबविले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कारके व उपाध्यक्ष रवि काळभोर यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group